उन्हाळी गर्दीसाठी मध्य रेल्वेचा दिलासा

उन्हाळी गर्दीसाठी मध्य रेल्वेचा दिलासा

Published on

उन्हाळी गर्दीसाठी मध्य रेल्वेचा दिलासा
प्रवाशांच्या सोयीसाठी आठ अतिरिक्त फेऱ्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई आणि पुण्यातून नागपूर तसेच कोकण मार्गावर मडगावपर्यंत विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण आठ विशेष फेऱ्या चालवण्यात येणार असून, प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

ट्रेन क्रमांक ०१०२१ एलटीटी-नागपूर विशेष गाडी ३ एप्रिलला रात्री १२.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. परतीची ट्रेन क्रमांक ०१०२२ नागपूर-एलटीटी विशेष गाडी त्याच दिवशी रात्री ८ वाजता नागपूरहून सुटेल. या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा येथे थांबे देण्यात आले आहेत. ट्रेन क्रमांक ०१४६७ पुणे-नागपूर विशेष गाडी ३ एप्रिलला दुपारी ३.५० वाजता पुणे येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल. परतीची ट्रेन क्रमांक ०१४६८ नागपूर-पुणे विशेष गाडी ४ एप्रिलला सकाळी ८ वाजता सुटेल. या गाडीला दौंड, अहमदनगर, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला आणि बडनेरा येथे थांबे असतील. दुसरीकडे कोकण मार्गावरील प्रवाशांसाठी ट्रेन क्रमांक ०११२९ सीएसएमटी-मडगाव विशेष गाडी ३ आणि ५ एप्रिलला रात्री १२.२० वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी ३.१५ वाजता मडगावला पोहोचेल. परतीची ट्रेन क्रमांक ०११३० मडगाव-सीएसएमटी विशेष गाडी सायंकाळी ४ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता मुंबईत येईल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे थांबे देण्यात आले आहेत.

आरक्षण सुरू
मध्य रेल्वेच्या या विशेष गाड्यांसाठीचे आरक्षण २४ मार्च २०२६ पासून भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com