थकीत मालमत्ता करासाठी पालिकेचा बडगा

थकीत मालमत्ता करासाठी पालिकेचा बडगा
Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : महापालिकेच्या कर निर्धारण व संकलक खात्याने मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार सूचना देऊनही कराचा भरणा न केल्यामुळे भांडुप, कांजूर आणि सांताक्रूझ परिसरातील विविध औद्योगिक संस्था आणि गृहनिर्माण संस्थांच्या मोकळ्या भूखंडांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मालमत्ता करवसुलीसाठी पालिकेने राबवलेल्या या धडक मोहिमेमुळे मोठ्या थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

नॅशनल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन, देवलँड हाउसिंग आणि शरद को-ऑप हाउसिंग सोसायटी यांसारख्या मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांवर ​बृहन्मुंबई महापालिका अधिनियम १८८८च्या कलम २०६ (२) नुसार ही कारवाई केली जात आहे. नॅशनल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनच्या मालकीचे विविध भूखंड (एलबीएस मार्ग, आर्या होंडा शोरूम आणि अनंता हॉटेलजवळ) लिलावासाठी काढले आहेत. या मालमत्तांवर सुमारे पाच कोटी ते १० कोटींपर्यंतची कर थकबाकी आहे. एका विशिष्ट भूखंडावर १० कोटी २० लाखांहून अधिक थकबाकी आहे.

देवलँड हाउसिंग आणि स्क्वेअर रिअल्कॉन इंडिया यांच्या मालकीच्या विक्रोळी येथील भूखंडावरही जप्तीची कारवाई प्रस्तावित आहे. या मालमत्तेवर तीन कोटी ७४ लाखांहून अधिक कर थकीत आहे. सरोजिनी नायडू रोड येथील शरद को-ऑप हाउसिंग सोसायटीच्या १,४०६.१० चौ.मी. भूखंडाचाही लिलाव केला जाणार आहे. यावर तीन कोटी ८० लाखांची थकबाकी आहे.

पालिकेकडून नोटीस जाहीर
​पालिकेने ३१ मार्चपर्यंत या मालमत्तांच्या लिलावासाठी अल्प सूचना प्रसिद्ध केली आहे. लिलावापूर्वी थकीत कराचा पूर्ण भरणा न केल्यास या जमिनींचा ताबा नव्या खरेदीदाराकडे सोपवण्याची प्रक्रिया पालिकेकडून राबवली जाईल. ​या कारवाईबाबत अधिक माहिती आणि अटी पालिकेच्या कर निर्धारण व संकलक कार्यालयात उपलब्ध आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com