

प्रियकराने स्तुती केल्याने
तरुणीचे केस कापले
वर्सोव्यात तरुणीसह अन्य दोन मैत्रिणींवर गुन्हा
मुंबई, ता. २६ : प्रियकराने स्तुती केली म्हणून तरुणीने घरात शिरून २० वर्षीय तरुणीचे केस कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रसंगाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकीही तिने पीडित तरुणीला दिली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री १२.३०च्या सुमारास वर्सोवा येथील उच्चभ्रू वसाहतीत घडली. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी २१ वर्षीय आरोपी तरुणीसह तिच्या दोन मैत्रिणींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पीडितेचा आरोपी तरुणी आणि तिच्या प्रियकरासोबत परिचय होता. प्रियकर तरुणाने आरोपी तरुणीसमोर तक्रारदार तरुणीच्या केसांची स्तुती केली. त्यामुळे आरोपी तरुणी अस्वस्थ झाली. त्यांच्यात जवळीक वाढल्याच्या संशयातून ७ मार्चला आरोपी तरुणी तक्रारदार तरुणीच्या घरी आली आणि तिचा मोबाईल तपासला. त्यात काहीच आक्षेपार्ह आढळले नाही. मंगळवारी रात्री १२.३०च्या सुमारासही ती पुन्हा तक्रारदार तरुणीच्या घरी आली. तिच्यासोबत दोन मैत्रिणीही होत्या. या तिघींनी तक्रारदार तरुणीला घराबाहेर खेचून तिचे केस कैचीने कापले. या प्रसंगाचा मोबाइलद्वारे व्हिडिओ काढला आणि तो वायरल करण्याची धमकी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.