‘वनराणी’ची सेवा होणार पूर्ववत

‘वनराणी’ची सेवा होणार पूर्ववत
Published on

‘वनराणी’ची सेवा होणार पूर्ववत
मुंबई, ता. २७ : बोरिवली (पूर्व) येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील ‘वनराणी’ टॉय ट्रेनची सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही सेवा तत्काळ पूर्ववत करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी वनराणी टॉय ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. दुरुस्तीसाठी तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, काम सुरू करण्यात आले आहे. संबंधित बिघाड लवकरच दूर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच दुरुस्ती पूर्ण होताच वनराणी मिनी ट्रेन पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले आहे. स्थानिक खासदार पीयूष गोयल यांनी पुढे असेही निर्देश दिले, की अशा प्रकारच्या समस्या पुन्हा उद्भवू नयेत, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. तसेच भविष्यात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तत्काळ प्रतिसाद व सेवा पूर्ववत करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्यात यावी, जेणेकरून पर्यटकांना अखंडपणे टॉय ट्रेनचा आनंद घेता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com