

विजयपत सिंघानिया यांच्यावर अंत्यसंस्कार
मुंबई, ता. २९ : रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांच्या पार्थिवावर आज चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे काल रात्री वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले.
सिंघानिया यांनी दोन दशके रेमंड उद्योग समूहाचे अध्यक्षपद सांभाळले होते. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आज दुपारी ३ वाजता काळबादेवी येथील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. या वेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य, नातलग, मित्र तसेच विविध क्षेत्रांतील उद्योजक हजर होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अंत्यसंस्काराला हजर राहून त्यांना आदरांजली वाहिली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही सिंघानिया यांना आदरांजली वाहिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.