सरकारी योजनेतून एकापेक्षा जास्त घरे लटणाऱ्यांना बसणार चाप

सरकारी योजनेतून एकापेक्षा जास्त घरे लटणाऱ्यांना बसणार चाप
Published on

सरकारी योजनेतून एकापेक्षा जास्त घरे लटणाऱ्यांना बसणार चाप
गृहनिर्माण विभाग युनिफाईड पोर्टल तयार करणार; दुबार घरे घेणाऱ्यांची माहिती सहज मिळणार
बापू सुळे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : म्हाडा, सिडकोसह वेगवेगळ्या सरकारी गृहनिर्माण संस्थांकडून उभारल्या जाणाऱ्या योजनेतून एकापेक्षा जास्त घरे लाटणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. त्यासाठी राज्याच्या गृहनिर्माण विभागाकडून युनिफाईड पोर्टल तयार केले जाणार असून, त्यावर सर्वच सरकारी योजनेतून उभारल्या जाणाऱ्या घरांची आणि त्यांच्या लाभार्थ्यांची माहिती उपलब्ध असणार आहे. त्यामुळे सरकारी योजनेतून दुबार घरे घेणाऱ्यांना आळा बसणार आहे.
सध्या सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा, सिडको, मुंबई महापालिका, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, एसआरएच्या माध्यमातून गृहनिर्माण प्रकल्प राबवून गरजू कुटुंबाला घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. मात्र, अनेक जण वेगवेगळ्या सरकारी योजनेतून दुबार घरे घेताना दिसत आहे. सदर घर घेताना त्यांच्याकडून याआधी सरकारी योजनेतून घर घेतले नसल्याचे हमी पत्र लिहून घेतले जात असले तरी त्याची खातरजमा करण्यासाठी कोणताही एकत्रित प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही. त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची गंभीर दखल घेत राज्याच्या गृहनिर्माण विभागाकडून युनिफाईड पोर्टल तयार केले जाणार असून, त्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती गृहनिर्माण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

तत्काळ क्रॉस पडताळणी करता येणार
सध्या म्हाडा, सिडको, मुंबई महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थाकडून बांधल्या जाणाऱ्या घरांची सोडत ऑनलाइन काढली जाते. त्यासाठी अर्जासह इतर सर्व प्रक्रिया ऑनलाइन पार पडली जात असली तरी त्यांचा डेटा किंवा पोर्टल एकमेकांना लिंक नाहीत. त्यामुळे क्रॉस व्हेरिफिकेशन करता येत नाही. त्यामुळे युनिफाईड पोर्टल तयार केले जाणार आहे. त्यामुळे एखाद्याने घरासाठी अर्ज करताच त्याने याआधी कोणत्या सरकारी योजनेतून घर घेतले आहे का, हे समोर येणार असून, त्याचे क्रॉस व्हेरिफिकेशन करणे शक्य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com