

राजेश खन्ना अनिताचे पती नव्हे!
उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबतच्या नातेसंबंधाला विवाह घोषित करण्याची मागणी करणारी अभिनेत्री अनिता अडवाणींची याचिका बुधवारी (ता. १) उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
दिंडोशी न्यायालयाने याआधी फेटाळून लावलेल्या दिवाणी दाव्याला अडवाणी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी न्या. शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी सर्व प्रतिवादींचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने दिंडोशी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. २०१७मध्ये तांत्रिक कारणांच्या आधारावर दिंडोशी न्यायालयाने अपील फेटाळले होते. त्या आधारावरच हे अपील फेटाळत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
अडवाणी आणि डिंपल कापडिया यांच्यात २०१२पासून अनेक न्यायालयीन वाद सुरू आहेत. अडवाणी यांनी राजेश खन्ना यांच्याशी आपले संबंध असल्याचा दावा केला होता. अन्य एका दाव्यातही अडवाणी यांनी कापडिया, खन्ना यांचे जावई अक्षय कुमार आणि मुलगी ट्विंकल खन्ना यांच्याविरोधात वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात घरगुती हिंसाचाराची तक्रारही दाखल केली होती. राजेश खन्ना यांच्या निधनानंतर त्यांना त्यांच्या ‘आशीर्वाद’ या बंगल्यातून बाहेर काढण्यात आल्याचा आरोप त्या अर्जातून केला होता. याप्रकरणी २०१५मध्ये उच्च न्यायालयाच्या समन्वय खंडपीठाने महिला कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण देणारा कायदा २००५अंतर्गत राजेश खन्ना आणि अडवाणी यांचे संबंध विवाहासारखे नाते म्हणून पात्र ठरत नाहीत, असे निरीक्षण नोंदवून कापडिया, ट्विंकल आणि अक्षय कुमार यांच्याविरुद्धची घरगुती हिंसाचाराची कार्यवाही रद्द केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.