एलपीजी गॅस सिलिंडरचा देशात पुरवठा स्थिर

एलपीजी गॅस सिलिंडरचा देशात पुरवठा स्थिर
Published on

एलपीजी गॅस सिलिंडरचा देशात पुरवठा स्थिर
डिजिटल माध्यमांचा वापर करा; हिंदुस्थान पेट्रोलियमचे आवाहन

मुंबई, ता. ४ : सध्या जागतिक भूराजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरही देशांतर्गत एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा स्थिर आणि पुरेसा असल्याचा दावा हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल)ने केला आहे. ग्राहकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून बुकिंग करणे, अनावश्यक रांगा लावणे किंवा साठेबाजी करणे टाळावे, असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, घरगुती ग्राहकांना अखंडित पुरवठा सुनिश्चित केला जात असून दररोज १५ लाख २० हजारांहून अधिक सिलिंडरचे वितरण करण्यात येत आहे. हा पुरवठा नियमित पातळीशी सुसंगत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

डिजिटल बुकिंगला प्राधान्य
ग्राहकांनी रिफिल बुकिंगसाठी आयव्हीआरएस, एसएमएस, मिस कॉल, एचपी पे आणि व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या डिजिटल माध्यमांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या सुमारे ९३ टक्के बुकिंग डिजिटल माध्यमांतूनच होत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

पेट्रोल-डिझेल पुरवठाही सुरळीत
कंपनीच्या रिटेल नेटवर्कमधून ३ एप्रिलला ३.६ कोटी लिटरपेक्षा अधिक पेट्रोल आणि ६.७ कोटी लिटरपेक्षा अधिक डिझेल पुरवठा करण्यात आला असून इंधन वितरणही स्थिर असल्याचे कंपनीने सांगितले.

गैरप्रकारांवर कारवाई तीव्र
गैरव्यवहार रोखण्यासाठी एचपीसीएलने आकस्मिक तपासण्या वाढवल्या आहेत. आतापर्यंत तीन हजार ६५० पेक्षा अधिक तपासण्या करण्यात आल्या असून १२ वितरकांचे निलंबन करण्यात आले आहे. एकूण ३१ वितरकांवर कारवाई झाली आहे. याशिवाय इतर तेल कंपन्या आणि राज्य सरकारांच्या समन्वयाने ६५३ छापे, ४० एफआयआर आणि तीन हजार १६३ सिलिंडर जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन
एलपीजीची उपलब्धता पूर्णपणे स्थिर असून टंचाईची कोणतीही शक्यता नसल्याचे एचपीसीएलने स्पष्ट केले आहे. ग्राहकांनी केवळ अधिकृत माध्यमांवर विश्वास ठेवावा आणि तातडीच्या मदतीसाठी कंपनीच्या टोल-फ्री क्रमांक किंवा अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com