

घाटकोपरमध्ये पाणीपुरवठा पूर्ववत
जलाशय दुरुस्ती पूर्ण; १० एप्रिलपासून जुन्या वेळेनुसार पाणी
मुंबई, ता. ८ : घाटकोपर पश्चिमेतील निम्नस्तरीय जलाशयाच्या दुरुस्तीचे काम पालिकेच्या जल अभियंता खात्याकडून यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या १० एप्रिलपासून या परिसरातील पाणीपुरवठा पुन्हा एकदा पूर्ववत होणार असून, नागरिकांना दुरुस्तीपूर्व असलेल्या वेळेनुसारच पाणी मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून जलाशयाच्या दोन कप्प्यांच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठ्याच्या वेळेत तात्पुरते बदल करण्यात आले होते. मात्र, आता काम पूर्ण झाल्याने नारायणनगर, पंतनगर आऊटलेट आणि सर्वोदय बुस्टिंग या क्षेत्रांत सुधारित वेळा लागू होतील.
महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना पुढील पाच दिवस पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन केले आहे. तसेच दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा सुरळीत होत असला, तरी नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असेही पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या घाटकोपरमधील हजारो रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अशा असतील सुधारित वेळा
- नारायणनगर व एनएक्स ०३ क्षेत्र : चिरागनगर, आझाद नगर, विद्याविहार (पश्चिम), एल.बी.एस. मार्ग परिसर आणि किरोळ गाव भागात आता दुपारी ३.१५ ते सायंकाळी ७.१५ या वेळेत पाणीपुरवठा होईल.
- पंतनगर आऊटलेट व एनएक्स ०६ क्षेत्र : भीमनगर, नित्यानंद नगर, सी.जी. एस. वसाहत आणि श्रेयस सिग्नल परिसरासाठी सायंकाळी ६.४५ ते रात्री ११ वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
- सर्वोदय बुस्टिंग क्षेत्र : सॅनिटोरियम गल्ली, गांधीनगर आणि कामा गल्ली परिसरात पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.१५ अशी राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.