

भुयारी मेट्रो मार्गावर सवलतीत पास
विद्यार्थी, पर्यटकांसाठी विशेष दराची घोषणा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : आरे-नरिमन पॉइंटदरम्यान धावणाऱ्या भुयारी मेट्रो मार्गावर आता विद्यार्थी आणि पर्यटकांना सवलतीच्या दरात पास मिळणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने विशेष सवलतीच्या पासची घोषणा केली आहे. ‘डिजिटल मोबिलिटी’ला चालना देण्यासाठी हे सर्व पास नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
एमएमआरसीने जाहीर केलेल्या विशेष सवलत पासनुसार इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ४५ आणि ६० ट्रिपच्या पासवर २५ टक्के सवलत दिली जाणार आहे. या पासची वैधता ३० दिवसांची असेल. यामुळे विद्यार्थ्यांचा दरमहा प्रवासाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार असून सुरक्षित आणि वातानुकूलित प्रवासाची खात्री मिळणार आहे. तसेच दिव्यांग प्रवाशांनाही ४५ आणि ६० ट्रिप पासवर २५ टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे.
मुंबई फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यकांसाठी मेट्रोने खास ‘टुरिस्ट पास’ सादर केले आहेत. एकदा पास काढला की कितीही वेळा प्रवास करण्याची त्यांना मुभा मिळणार आहे.
- एक दिवसाचा पास (अमर्यादित प्रवास) - २८० रुपये शुल्क
- तीन दिवसांचा पास (अमर्यादित प्रवास) - ७०० रुपये शुल्क
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.