

वनतारा विद्यापीठाची स्थापना
अनंत अंबानी यांचा पुढाकार; गुजरातमध्ये उभारणी
जामनगर, ता. १० : रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांच्या वनतारा या जागतिक वन्यजीव संरक्षक संघटनेने गुजरातच्या जामनगरमध्ये वन्यजीव संरक्षण आणि पशुवैद्यक शास्त्र या क्षेत्राला वाहून घेतलेले वनतारा विद्यापीठ स्थापन केले आहे.
पशुकल्याण क्षेत्रातील शास्त्रीय संशोधन वाढवणे तसेच वन्यजीव संरक्षणाचे भवितव्य या क्षेत्रांवर या विद्यापीठाचा भर असेल. पशुवैद्यक औषधे, वन्यजीव संरक्षण आणि वन्यजीवांचे जतन या क्षेत्रात पुढील तज्ज्ञ निर्माण करणे, हे या विद्यापीठाचे ध्येय आहे. या विद्यापीठाचे अभ्यासक्रम, या क्षेत्रातील भारताच्या परंपरागत ज्ञानाचा वापर करून, या क्षेत्रातील शिक्षणाचे भविष्यकाळासाठी सज्ज असे मॉडेल तयार करतील. ‘आपण वन्यजीवांच्या सेवेसाठी सहानुभूती, ज्ञान आणि कौशल्य यांच्या साह्याने आपले मन तसेच संस्था कशा घडवतो, यावर पशुसंवर्धनाचे भविष्य अवलंबून राहील, या वन्यजीवांना होणारा त्रास पाहता त्यांची काळजी घेण्याच्या क्षेत्रात बरेच काही करण्याची आवश्यकता आहे, प्रत्येक जीवाचे संरक्षण करणारी नवी पिढी तयार करण्यासाठी हे विद्यापीठ कटिबद्ध आहे,’ असे अनंत अंबानी म्हणाले.
विद्यापीठाचा भूमिपूजन समारंभ शुक्रवारी (ता. १०) हिंदू परंपरेनुसार झाला. या वेळी शिक्षण शास्त्र, वन्यजीव जतन आणि सार्वजनिक क्षेत्रातील अनेक मान्यवर हजर होते. यात अनंत अंबानी यांचे शिक्षक आणि त्यांना घडवणारी थोर व्यक्तिमत्त्वे हजर होती. वनतारा विद्यापीठ या क्षेत्रातील भिन्नभिन्न विद्या शाखांचे एकाच शैक्षणिक परियंत्रणेत एकत्रीकरण करेल. आजच्या जगातील वन्यजीव संरक्षण व्यवस्थेशी हा अभ्यासक्रम निगडित असेल. वनताराने या क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या कामाच्या अनुभवाचा लाभ घेऊन हे विद्यापीठ, हा प्रत्यक्ष अनुभव आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करेल. तज्ज्ञ व्यावसायिकांनी वन्यजीवांशी संबंधित गुंतागुंतीच्या आव्हानांवर तोडगा काढावा, यासाठी त्यांना सज्ज केले जाईल.
आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि निवासी संकुल
वनतारा विद्यापीठात वन्यजीव औषधे आणि शस्त्रक्रिया, पोषण त्यांची वर्तणूक शास्त्र, त्यांची आनुवंशिकता, साथीचे रोग, आरोग्य संरक्षणाचे धोरण तसेच नैसर्गिक पशुसंवर्धनपूरक वातावरण निर्मिती, या विषयांवरील पदवीपूर्व, पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच विशेष अभ्यासक्रम असतील. विद्यापीठातर्फे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या निम्नस्तरातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीदेखील दिली जाईल. या विद्यापीठात अत्याधुनिक शैक्षणिक आणि वैद्यकीय पायाभूत सुविधा, वेगवेगळ्या प्रकारचे आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि निवासी संकुल असेल. पशु संगोपन आणि आधुनिक पशुसंवर्धन पद्धती यांना सक्षम करण्यासाठी कृती आधारित संशोधनावर विद्यापीठ भर ठेवेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.