हाफकिनच्या ‘खासगीकरणा’चा डाव उघड करा; काँग्रेसचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

हाफकिनच्या ‘खासगीकरणा’चा डाव उघड करा; काँग्रेसचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Published on

हाफकिनच्या ‘खासगीकरणा’चा डाव
काँग्रेसचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १२ ः महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आणि १२५ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या हाफकिन संस्थेला जाणीवपूर्वक कमकुवत करण्यात येत आहे. तसेच ती खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा मोठा कट रचला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केला आहे. हा केवळ प्रशासकीय गोंधळ नसून ठरावीक ‘कॉर्पोरेट’ समूहांच्या फायद्यासाठी आखलेला हा एक सुनियोजित प्रकल्प असल्याचा दावा काँग्रेसचे सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे.

​प्लेगपासून ते कोविड-१९ पर्यंतच्या संकटात देशाला वाचवणाऱ्या हाफकिन संस्थेची ‘सीड स्ट्रेन्स’ आणि जैविक संपत्ती हा राष्ट्रीय ठेवा आहे. अशा अमूल्य संपत्तीचा ‘ग्लोबल ईओआय’ काढून खासगी कंपन्यांना हस्तांतरण करण्याचा प्रयत्न हा सार्वजनिक आरोग्य सुरक्षेवर थेट घाला आहे. काही मोठ्या कॉर्पोरेट समूहांना झुकते माप दिले जात असल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
​संस्थेतील भ्रष्टाचारावर ताशेरे ओढताना शिंदे यांनी ‘कॅग’च्या निरीक्षणांचा दाखला दिला. कोट्यवधी रुपयांची जीएसटी तफावत आणि १३ कोटी रुपयांच्या खर्चाचा हिशेब न लागणे, ही जनतेच्या पैशांची उघड लूट आहे. तसेच, संस्थेच्या आवारातील ऐतिहासिक सागवान लाकडांची भंगार दरात विक्री करून महाराष्ट्राच्या वारशाचा अपमान करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हाफकिन ही केवळ संस्था नसून महाराष्ट्राच्या वैज्ञानिक स्वाभिमानाची प्रतीक आहे. सरकारने हा खासगीकरणाचा डाव तातडीने थांबवला नाही, तर रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा धनंजय शिंदे यांनी दिला आहे.

महाराष्ट्र धर्माशी द्रोह
हाफकीनचा लिलाव हा ‘महाराष्ट्र धर्मा’शी द्रोह आहे. या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी जाहीर करावी. सर्व प्रकारचे ईओआय आणि खासगीकरण प्रक्रिया त्वरित स्थगित कराव्यात. आर्थिक गैरव्यवहारातील दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com