

राज्यभरातील तरुणाईला एकत्र आणण्यासाठी महायुवोत्सव
सहभागी होण्याचे पुर्वेश सरनाईक यांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता १४ : युवासेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी आणि राज्यभरातील तरुणाईला एकत्र आणण्यासाठी आयोजित महायुवोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी केले आहे.
राज्यभर युवासेनेची संघटनात्मक वाढ अधिक भक्कम करण्यासाठी, तसेच नव्या तरुण नेतृत्वाला संधी देत संघटनेचा विस्तार करण्याच्या उद्देशाने युवासेनेचे वार्षिक संमेलन ‘महायुवोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आले आहे. हा महायुवोत्सव दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायं ५.०० या वेळेत सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे पार पडणार आहे.
शिवसेनेचे मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात हा महायुवोत्सव पार पडणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या हस्ते युवासेनेच्या अधिकृत वेबसाइटचे अनावरण करण्यात येणार असून, सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ आणि युवासेनेचे नवीन प्रेरणादायी गाणेही या मंचावरून प्रदर्शित केले जाणार आहे.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार धैर्यशील माने, नवनियुक्त खासदार ज्योतीताई वाघमारे आदी मान्यवर उपस्थित राहून युवकांना मार्गदर्शन करतील. राज्य भरातून सुमारे १५ हजार युवक या संमेलनासाठी उपस्थित राहतील.
मराठी तरुणांचा शिवगौरव पुरस्काराने सन्मान
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे बिरदेव सिद्धाप्पा डोणे (आयपीएस), शिवानंद कुंभार, पूजा गवस, सिद्धेश लोकरे, विकास हांडे, मल्हार कालंबे या मराठी तरुणांना शिवगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यादरम्यान, पक्षप्रवेश तसेच युवासैनिकांचे सत्कार करण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.