

खेरवाडी हत्येतील आरोपीला अटक
मुंबई, ता. १७ ः खेरवाडी येथे सुरक्षा रक्षकाची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी गुरुवारी (ता. १६) रात्री कोलकता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावरून अटक केली. निरजकुमार चौधरी असे आरोपीचे नाव असून पोलिस ससेमिरा चुकवण्यासाठी दिल्लीला जाणारे विमान पकडताना खेरवाडी पोलिसांनी त्याची गचांडी आवळली.
म्हाडा कार्यालयाजवळ १३ एप्रिलला दुपारी सुरक्षा रक्षक अभिनव कुमार याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. ही हत्या प्रेमसंबंधांतून घडल्याची माहिती खेरवाडी पोलिसांना मिळाली. अभिनव याचे एक तरुणीसोबत प्रेमसंबंध होते; मात्र पालकांनी तिचे लग्न निरजसोबत ठरवले. त्यास तिचा नकार होता. त्याचा राग मनात ठेवून निरजने अभिनवचा काटा काढण्याचा निर्णय घेतला, असे तपासात स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.