

सरकारकडून देश दुभंगण्याचे कारस्थान
मतदारसंघ फेररचनेवरून राज ठाकरे यांची टीका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : ‘लोकसभा मतदारसंघांची फेररचना आणि महिला आरक्षणाच्या नावाखाली केंद्र सरकार स्वतःची सत्ता कायमस्वरूपी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकसंख्येच्या जोरावर उत्तरेकडील राज्यांचे वर्चस्व वाढवून दक्षिणेकडील आणि प्रगत राज्यांचा आवाज दाबण्याचे हे कारस्थान देश कायमचा दुभंगायला कारणीभूत ठरेल,’ असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका पत्रक काढून स्पष्ट केली आहे.
राज ठाकरे म्हणाले, ‘मनसेचा महिला आरक्षणाला विरोध नाही. उलट त्याचे स्वागतच आहे. या विधेयकाची घाई आणि त्यासोबत जोडलेली मतदारसंघांची फेररचना संशयास्पद आहे. ज्या राज्यांनी कुटुंबनियोजन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करून लोकसंख्या मर्यादित ठेवली, त्या महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण भारताला कमी जागा देऊन शिक्षा दिली जात आहे. दुसरीकडे लोकसंख्या वाढवणाऱ्या राज्यांना संसदेत अधिक वाटा देऊन केंद्रातले संख्याबळ वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला.
भाजप आता सत्तेच्या हव्यासापोटी देशात दोन गट पाडत आहे. हा असंतोष उद्या खलिस्तानसारख्या रक्तरंजित संघर्षाला किंवा राज्यांच्या स्वायत्ततेच्या मागणीला निमंत्रण देऊ शकतो. या अन्यायाविरोधात मनसे वेळ पडल्यास तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
.......
राज्यांची सांस्कृतिक अस्मिता धोक्यात!
हा देश एक संघराज्य असल्याचे भानही केंद्राला राहिले नसल्याचे सांगून राज ठाकरेंनी आर्थिक विषमतेवरही बोट ठेवले. महाराष्ट्राने एक रुपया कर दिला तर ३०-४० पैसे परत मिळतात, तर उत्तर प्रदेश आणि बिहारला कैक पटीने जास्त निधी दिला जातो. उद्या वाढलेल्या खासदारांच्या जोरावर संपूर्ण देशावर ‘हिंदी’ लादली जाईल आणि राज्यांची सांस्कृतिक अस्मिता धोक्यात येईल, अशी भीती राज ठाकरेंनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.