आंतरराष्ट्रीय कंपनीत २० कोटींचा घोटाळा

आंतरराष्ट्रीय कंपनीत २० कोटींचा घोटाळा
Published on

आंतरराष्ट्रीय कंपनीत २० कोटींचा घोटाळा
न्यायवैज्ञानिक लेखापरीक्षणातून संचालकाची चोरी उघड; देशविदेशात मालमत्ता विकत घेतल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः तयार कपडे जागतिक बाजारपेठेत उपलब्ध करून देणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीत तब्बल २० कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या संचालकाविरोधात अंधेरी पोलिसांनी गुन्हा नोंदवला. संबंधित कंपनीने अचानक आरंभलेल्या न्यायवैज्ञानिक लेखापरीक्षणामध्ये संचालकाची लबाडी उघड झाली.
दीपक कसाना असे या संचालकाचे नाव आहे. घोटाळ्यातून हाती आलेल्या रकमेतून त्याने देशविदेशात नऊ मालमत्ता विकत घेतल्याची माहिती प्राथमिक चौकशीत उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कंपनीच्या भारतासह बांगलादेश, ब्रिटनसह अन्य देशांत शाखा आहेत. आरोपी कसाना गेल्या २० वर्षांपासून या कंपनीच्या बांगलादेश शाखेत संचालक म्हणून कार्यरत होते.
२०१२ मध्ये कंपनीने लागणारा कच्चा माल विकत घेण्याचे सर्व अधिकार त्यांना दिले. त्या अधिकारांचा वापर करून कसाना यांनी पुरवठादाराकडून विकत घेतलेल्या कापडाचे दर कृत्रिमरीत्या फुगवून कंपनीस सादर करण्यास सुरुवात केली. अतिरिक्त रक्कम स्वतःकडे घेत त्यातून देशविदेशात निवासी, व्यवसायिक गाळे, जमिनी विकत घेतल्या.
काही महिन्यांपूर्वी भारतातील कंपनीच्या मुख्यालयाला बांगलादेश शाखेच्या व्यवसायात गडबड सुरू असल्याचे जाणवले. आरोप संचालकाच्या अपरोक्ष कंपनीने फॉरेन्सिक ऑडिट करून घेतले. त्यात तब्बल २० कोटींचा घोटाळा झाल्याचे आढळले. त्या आधारे कंपनीने आरोपीचा फोन, लॅपटॉप आदी उपकरणांची झाडाझडती घेतली तेव्हा हा घोटाळा स्पष्ट करणारे पुरावे सापडले. तेव्हा कंपनीने अंधेरी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील चौकशी, तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com