

टिटवाळा प्रकरण
आशियाई देशातून एक्स्टॅसीची खेप!
आरोपींचे आंतरराष्ट्रीय तस्करांशी संधान; मंगळवारपर्यंत काेठडी
मुंबई, ता. २२ : टिटवाळा प्रकरणातील आरोपी अश्विनी पॉल, आमिर सय्यद यांचे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्कर टोळ्यांशी संपर्क असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. ही तस्करी एअर कार्गोद्वारे झाली असावी, असा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, अश्विनी, आमिरसह तिघांच्या पोलिस कोठडीत दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी २८ एप्रिलपर्यंत वाढ केली.
टिटवाळा येथून जप्त केलेल्या पाच हजार एक्स्टॅसी गोळ्यांची खेप आरोपी आमिर याच्या मागणीनुसार आशिया खंडातील एका देशातून चोरट्या मार्गाने भारतात दाखल झाली होती, असे सांगण्यात आले. या गाेळ्या कोणत्या देशातून पाठवण्यात आल्या, त्या कोणी व कोणत्या मार्गाने भारतात आणल्या, आमिरने त्या अश्विनीपर्यंत कशा पाेहाेचवल्या, या प्रवासात अन्य कोणी सहकार्य केले, याबाबत दोघांकडे कसून चौकशी सुरू आहे.
२०२३मध्ये तब्बल ११ किलो हेरॉईनसह (ब्राऊन शुगर) अटक होण्यापूर्वी आमिर नोकरीच्या बहाण्याने अमली पदार्थांचे वाहक (कॅरिअर) विविध देशांत पाठवत हाेता. त्यांच्यामार्फत ताे अमली पदार्थ भारतात आणत हाेता. आमिर काही दिवस दुबईतही वास्तव्यास होता, अशीही माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली आहे.
कारवाईपूर्वी बराच साठा विकला
हेरॉईन प्रकरणातून जामीन मिळवून बाहेर येताच आमिरने एक्स्टॅसीची मोठी खेप भारतात मागवली. त्यातून बराच साठा त्याने अश्विनीसह विकला. पुढील साठ्याची विक्री होण्याआधीच खटल्याच्या सुनावणीस सतत गैरहजर राहिल्याबद्दल त्याचा जामीन रद्द करण्यात आला. तेव्हा त्याने उर्वरित पाच हजार एक्स्टॅसी गोळ्या अश्विनीकडे दिल्याचे तपासातून पुढे आल्याचे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.