

केईएममध्ये रुग्णाची आत्महत्या
मुंबई, ता. २४ ः केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने शुक्रवारी सकाळी हेमेटॉलॉजी विभागाबाहेरील खांबाला गळफास घेतला. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत चौकशी सुरू केली आहे.
रक्ताच्या कर्करोगाने (ल्युकेमिया) ग्रस्त या तरुणावर महिनाभरापासून केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला पुढील आठवड्यात घरी सोडले जाणार होते, अशी माहिती पोलिसांना प्राथमिक चौकशीत प्राप्त झाली. या घटनेनंतर पालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिग्रे यांनी रुगालयात भेट दिली आणि सुरक्षा रक्षक, परिचारिकांनी अधिक सतर्क राहावे, अशी सूचना केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.