

अवयवदानातून तिघांना जीवदान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः वाशी येथील एमजीएम न्यू बॉम्बे रुग्णालयात शनिवारी (ता. २५) पार पडलेल्या अवयवदानामुळे तिघांना जीवनदान मिळाले आहे. मुंबई विभागातील हे यंदाचे २२वे अवयवदान ठरले आहे.
वाशी येथील एमजीएम न्यू बॉम्बे रुग्णालयात प्रकृती अस्वास्थ्यामुळे ६६ वर्षीय महिलेवर उपचार सुरू होते; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाइकांना तेथील डॉक्टर आणि प्रत्यारोपण समन्वयकांनी अवयवदानाबाबत सविस्तर माहिती दिली. अवयवदानाचे महत्त्व पटवून दिल्यानंतर कुटुंबीयांनी अवयवदानासाठी होकार दिला.
डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर संबंधित महिलेचे यकृत आणि दोन मूत्रपिंडे दानासाठी योग्य असल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती विभागीय अवयवदान आणि प्रत्यारोपण समन्वय समितीला देण्यात आली. त्यानंतर राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अवयवांचे वाटप करण्यात आले. या प्रक्रियेमुळे तिघा गरजू रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.