

‘टिस’च्या प्राध्यापकाला
अडीच लाखांचा गंडा
मुंबई, ता. २६ ः टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या सहप्राध्यापकाला सायबर भामट्यांनी अडीच लाखांचा गंडा घातला. ‘इन्स्टामार्ट’ ॲपद्वारे मागवलेल्या किराणा साहित्याऐवजी भलतेच सामान त्यांच्यापर्यंत पोहोचले. ते बदलून घेण्यासाठी गुगलआधारे त्यांनी संबंधित ॲपच्या ग्राहक तक्रार केंद्राचा क्रमांक शोधला आणि संपर्क केला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने व्हॉट्सॲपवर एक लिंक पाठवून त्यावर तपशील भरल्यास पैसे परत मिळतील, असे सांगितले. त्यांनी ही लिंक उघडताच त्यांच्या खात्यातून पाच परस्पर व्यवहारात २.५७ लाख रुपये इतरत्र वळते झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.