

आयसीयूअभावी गमावला जीव
कूपर रुग्णालयावर नातेवाइकांचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : पालिकेच्या कूपर रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला वेळेवर आयसीयू बेड न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यावर प्रमुख पालिका रुग्णालयांचे संचालक डाॅ. शैलेश मोहिते यांनी याबाबत माहिती घेऊन याेग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले.
३८ वर्षीय कैलाश सिंग यांच्यावर नालासोपारा येथील खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यांना २५ एप्रिलला दुपारी कूपर रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांना श्वास घेण्यास त्रास आणि रक्तदाब कमी झाल्याने गंभीर स्थितीत कॅज्युअल्टी विभागात दाखल करण्यात आले. अखेर रात्री सुमारे ११च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
डॉक्टरांनी आयसीयू उपचारांची गरज व्यक्त केली; मात्र आयसीयू बेड उपलब्ध नसल्याचे सांगत त्यांना जनरल वॉर्डमध्येच ठेवण्यात आले, असे नातेवाइकांचे म्हणणे आहे. दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची तयारी कुटुंबीयांनी दर्शविली असता प्रकृती धोकादायक असल्याचे सांगण्यात आले.
रात्री उशिरा आयसीयू बेड उपलब्ध हाेता. वारंवार विनंती करूनही रुग्णाला आयसीयूमध्ये हलविण्यात आले नाही. अखेर रात्री सुमारे ११च्या सुमारास कैलाश सिंग यांचा जनरल वॉर्डमध्ये मृत्यू झाला, असा दावा पत्नी पूजा सिंग यांनी केला आहे.
कैलाश सिंग हे साउंड इंजिनियर म्हणून कार्यरत होते तसेत ते कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. अंत्यसंस्कारानंतर याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्धार कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
---
याेग्य माहिती घेऊन कारवाई!
रुग्ण कोणत्या परिस्थितीत रुग्णालयात दाखल झाला होता आणि त्याची प्रकृती गंभीर असताना आयसीयू बेड उपलब्ध का झाला नाही, याबाबतची माहिती घेण्यात येईल, असे प्रमुख पालिका रुग्णालयांचे संचालक डाॅ. शैलेश मोहिते म्हणाले.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.