धीरेंद्र शास्त्री व आमदार गायकवाडांवर विरोधात माविआ एकत्र

धीरेंद्र शास्त्री व आमदार गायकवाडांवर विरोधात माविआ एकत्र
Published on

धीरेंद्र शास्त्री, गायकवाड
यांच्याविरोधात मविआ एकत्र
कारवाईच्या मागणीसाठी शिवाजी पार्कवर आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चुकीची वक्तव्‍ये करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री, संजय गायकवाड यांच्याविरोधात महाविकास आघाडी एकत्र येणार आहे. महाविकास आघाडी, डावे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी तसेच पुरोगामी संघटना मंगळवारी (ता. २८) शिवाजी पार्क येथे निदर्शने करणार आहेत.

शिवसेनेचा आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना अर्वाच्च शिवीगाळ करून धमकी दिली हाेती. त्यावर अद्याप कठोर कारवाई केलेली नाही. बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भोंदूबाबा धीरेंद्र शास्त्रीवर कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी दादर शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात येणार असल्याचे मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी सांगितले. मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

मविआ एकत्र
आंदोलनानिमित्त अनेक महिन्यांनंतर महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र येणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सचिन अहिर तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबई अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्यावर या आंदोलनासाठी समन्वयाची जबाबदारी आहे. मुंबई महापालिका निवडणुकांनंतर पहिल्यांदा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते एकत्र येणार आहेत. सुजात आंबेडकर मुंंबईबाहेर असल्यामुळे पक्षाचे मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे या निदर्शनात भाग घेणार आहेत.

..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com