​बंगालचे अभिनंदन; पण नसरापूर घटनेचे काय?

​बंगालचे अभिनंदन; पण नसरापूर घटनेचे काय?
Published on

​बंगालचे अभिनंदन; पण नसरापूर घटनेचे काय?
महापालिकेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ४ : मुंबई महापालिका सभागृहात सोमवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. पश्चिम बंगालमधील विजयावरून सत्ताधाऱ्यांनी अभिनंदनाचे ठराव मांडले, तर नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणावर सभागृहात मौन पाळल्याने विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला.
विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. पश्चिम बंगालमध्ये विजयाबद्दल सत्ताधाऱ्यांनी अभिनंदनाचे ठराव मांडले. आम्हीही मोठ्या मनाने त्याचे स्वागत केले; पण नसरापूरमध्ये चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेचा सत्ताधाऱ्यांना विसर कसा पडला? सभागृहात आयुक्तांपासून ते अनेक वरिष्ठ पदांपर्यंत महिला असतानाही एका लहान बालिकेला श्रद्धांजली वाहण्याचा ठराव मांडला गेला नाही. सत्ताधारी बेभान होऊन पेढे वाटत आहेत, पण त्यांना साधा नैतिक पाठिंबा देण्याचीही तसदी प्रशासनाने घेतली नाही, अशा शब्दांत पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला.
----
​लोकशाहीचा गळा आवळला!
काँग्रेस नेते अश्रफ आझमी यांनीही सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेचा धिक्कार केला. राज्यात लहान-मोठी दुर्घटना घडली तरी आपण त्याबद्दल शोक व्यक्त करतो. येथे एका चिमुरडीची हत्या झाली असूनही सभागृहात एक शब्दही उच्चारला गेला नाही. सत्ताधारी इतरांचा विजय स्वीकारायला तयार नाहीत. काँग्रेसच्या केरळममधील विजयाबद्दल पेढे वाटण्याची परवानगी मिळवण्यासाठीही आम्हाला संघर्ष करावा लागला. ही कसली लोकशाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
---
ईव्हीएमची ‘अमर भूपाळी’ येईलच!
केरळममधील विजयाचे पेढे वाटण्यासाठी परवानगी नाकारल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसवर गटनेते गणेश खणकर यांनी आक्षेप घेतला. नियम पाळून परवानगी मागितली असती तर पेढे वाटता आले असते, पण विरोधकांना फक्त राजकारण करायचे आहे. आता केरळमध्ये जिंकल्यावर त्यांना ईव्हीएमवर विश्वास वाटतोय, पण उद्या सकाळी पुन्हा ‘ईव्हीएममध्ये घोटाळा झाला’ ही त्यांची ठरलेली ‘अमर भूपाळी’ ऐकायला येईलच, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com