दहाव्या मजल्यावरून पडून मजूर ठार

दहाव्या मजल्यावरून 
पडून मजूर ठार
Published on

दहाव्या मजल्यावरून
पडून मजूर ठार
कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल
मुंबई, ता. ४ ः भांडुपमध्ये निर्माणाधीन इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. मोहम्मद मसीबूल असे मृत मजुराचे नाव आहे. बांबूची परांची बांधताना तोल जाऊन तो खाली पडला. कुटुंबाने सुरुवातीला तक्रार करणे टाळले; मात्र चौकशीत कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा आढळल्याने पोलिसांच्या फिर्यादीवरून शनिवारी (ता. २) गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडुप पश्चिमेकडील गुरुद्वारा रोड येथे शशिकांत बदानी पॅराडाइस कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे इमारत बांधकाम सुरू आहे. या कंपनीने इमारतीभोवती परांची बांधण्याचे कंत्राट जोगेश्वरी येथील जयभवानी कंपनीस दिले होते. या कंपनीचे मालक महिपाल मुक्कू यांनी ३० एप्रिल रोजी सुरू केले; मात्र मजुरांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना न केल्याने मजूर तोल जाऊन दहाव्या मजल्यावरून थेट खाली पडल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे महिपाल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com