विचित्र अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू

विचित्र अपघातात
पादचाऱ्याचा मृत्यू
Published on

विचित्र अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू
रिंग निखळून लागल्याने दुर्घटना
मुंबई, ता. ४ ः नादुरुस्त वाहन उचलून नेणाऱ्या भरधाव टोइंग व्हॅनच्या चाकातील लोखंडी रिंग निखळून ती रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्याला लागली. रफी अहमद किडवई मार्गावरील नॅशनल मार्केटसमोर रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडलेल्या या विचित्र अपघातात जखमी पादचाऱ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरएके पोलिसांनी टोइंग व्हॅनचालक मोहम्मद फारुख शेखविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख नादुरुस्त कार टोइंग व्हॅनद्वारे गॅरेजमध्ये नेत होता; मात्र व्हॅनची नियमित-देखभाल केली नसल्याने वेग घेताच मागील चाकातील लोखंडी रिंग निखळली. ही रिंग उडून रस्त्यावरून पायी जाणाऱ्या शैलू मारुती या तरुणाच्या मानेजवळ लागली. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com