फ्लिपकार्टचे कार्ड पेमेंटसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन

फ्लिपकार्टचे कार्ड पेमेंटसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन
Published on

फ्लिपकार्टचे कार्ड पेमेंटसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन

मुंबई, ता. ८ : फ्लिपकार्ट या भारतातील स्वदेशी ई-कॉमर्स कंपनीने ॲक्सिस बँक आणि फिनटेक कंपनी पेयू यांच्या सहयोगाने कार्ड पेमेंटसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुरू केले आहे.
यामुळे ग्राहक फेस आयडी किंवा फिंगरप्रिंटचा वापर करून ॲक्सिस बँकेच्या कार्डद्वारे पेमेंटला मंजुरी देऊ शकतात. यामुळे ओटीपीमधील विलंब आणि अयशस्वी व्यवहारांचे प्रमाण कमी होईल. तसेच सुरक्षित व्यवहारांसह जलद पेमेंटला मान्यता मिळेल. यामुळे वापरकर्त्यांना अँड्रॉइड आणि आयओएस मोबाईलवर फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी वापरून व्यवहार करता येतील. ज्यामुळे ओटीपीची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे सिम-स्वॅप किंवा ओटीपी-आधारित फसवणूकीचा धोका कमी होतो. यातील पायाभूत सुविधा, उपकरणाची सुरक्षा आणि ओळख पटवण्याचे तांत्रिक व्यवहार, यांचे व्यवस्थापन पेयू करेल, तर विब्‍मोच्या (पेयू कंपनी) मदतीने ॲक्सिस बँक, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनची सुविधा देईल.

डिजिटल पेमेंट फसवणुकीला आळा घालण्यास बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन मदत करेल. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०२४ मध्ये डिजिटल फसवणुकीचे मूल्य पाच पटीने वाढून १,४०० कोटी रुपयांच्या पुढे गेले होते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने एसएमएस ओटीपीऐवजी बायोमेट्रिक आणि ऑथेंटिकेशनचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले आहे.
फ्लिपकार्ट-पेयू-ॲक्सिस बँक भागीदारीमुळे या यंत्रणेत आर्थिक व्यवहार करणाऱ्या ग्राहकांच्या व्यवहारांची सुरक्षा वाढेल आणि व्यवहारांच्या यशाचा दर सुधारेल, असे फ्लिपकार्टचे पेमेंट आणि सुपरकॉइन्स विभागाचे उपाध्यक्ष गौरव अरोरा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com