आठवड्यात १५ कोटींची उलाढाल

आठवड्यात १५ कोटींची उलाढाल
Published on

आठवड्यात १५ कोटींची उलाढाल
महालक्ष्मी सरस २०२६ला प्रतिसाद

मुंबई, ता. १० : महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, अवघ्या सात दिवसांत प्रदर्शनातून सुमारे १५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सीओओ नीलेश सागर आणि सीईओ निखिल ओसवाल यांनी आज येथे पत्रकारांना दिली.
सीओओ नीलेश सागर यांनी सांगितले, की महिलांना व्यवसायासाठी आवश्यक भांडवलासाठी यापूर्वी ६० हजार रुपये विनातारण दिले जात होते; मात्र आता हा निधी वाढवून तब्बल दीड लाख रुपयांपर्यंत करण्यात आला आहे.
या वेळी निखिल ओसवाल यांनी सांगितले, की महाराष्ट्रात आजपर्यंत सहा लाख सात हजार महिला बचत गटांची स्थापना झाली असून, त्यामध्ये ७१ लाखांहून अधिक महिलांचा सहभाग आहे. ग्रामीण भागात सुमारे ५५ टक्के आर्थिक सक्षमीकरण घडवून आणण्यात या अभियानाला यश आले आहे.
उमेद अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘उमेद मार्ट’ या ऑनलाइन व्यासपीठामुळे महिला बचत गटांची उत्पादने आता जागतिक स्तरावर पोहोचत आहेत. दोन वर्षांत या व्यासपीठावर ४,२०० हून अधिक उत्पादने नोंदवण्यात आली असून, यावर्षी आणखी १,००० नवीन उत्पादने समाविष्ट करण्यात आली आहेत. महिलांना डिजिटल विपणन आणि ऑनलाइन विक्रीचे विशेष प्रशिक्षण दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
एक लाख ‘लखपती दीदी’ तयार करण्याचे उद्दिष्ट अभियानाने ठेवले असून, हा आकडा आणखी ५० टक्क्यांनी वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिलांना व्यवसाय, विपणन आणि आर्थिक स्वावलंबनासाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
यंदाच्या महालक्ष्मी सरसमध्ये ५३५ उत्पादक स्टॉल्स आणि ८० खाद्यपदार्थ स्टॉल्स सहभागी झाले आहेत. मुंबईतील महालक्ष्मी सरस २०२६ मध्ये यंदा ४० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com