महापालिका मुख्यालय चकाचक होणार

महापालिका मुख्यालय चकाचक होणार
Published on

महापालिका मुख्यालय चकाचक होणार

परिसर, शाैचालय स्वच्छतेसाठी निविदा

​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबईचा ऐतिहासिक वारसा असलेल्या महापालिका मुख्यालयाचा परिसर आता स्वच्छ आणि निर्जंतुक होणार आहे. पालिकेने फोर्ट येथील मुख्य कार्यालयातील स्वच्छता आणि देखभालीसाठी कंबर कसली असून, कार्यालयाचे बोळ (पॅसेज) आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या (जनरल टॉयलेट्स) स्वच्छतेसाठी नवीन ई-निविदा प्रक्रिया जाहीर केली आहे. या कामासाठी पालिकेने पहिल्या टप्प्यात सुमारे २३ लाख ५५ हजार रुपयांहून अधिक खर्चाचा अंदाज वर्तवला आहे.

​मुख्यालयाची ऐतिहासिक इमारत आणि तिथे होणारी नागरिकांची मोठी वर्दळ लक्षात घेऊन स्वच्छतेचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. या निविदेनुसार निवडल्या जाणाऱ्या कंत्राटदाराला पुढील दाेन वर्षे मुख्यालयाचा कायापालट करण्याची जबाबदारी दिली जाईल. यात प्रामुख्याने मुख्यालयातील सर्व मजल्यांवरील पॅसेजची दररोज झाडलोट आणि ओल्या फडक्याने पुसून स्वच्छता केली जाणार आहे.

यासह मुख्यालयात येणारे नागरिक आणि कर्मचारी यांच्यासाठी असलेली शाैचालये अत्यंत स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त ठेवली जातील. यासाठी दर्जेदार जंतुनाशके आणि क्लिनिंग एजंट्सचा वापर करणे अनिवार्य असेल. या कामासाठी कंत्राटदाराला कामाच्या स्वरूपानुसार ‘नगवार दर’ पद्धतीने मोबदला दिला जाणार आहे.
​-----------------
अशी राबवणार निविदा प्रक्रिया
- पालिकेने ​पहिल्या टप्प्यातील कामासाठी १८ टक्के जीएसटीसह २३,५५८ निविदा शुल्क आकारले आहे, तर बोलीदारांना ३,५०,२०० इतकी सुरक्षा ठेव जमा करावी लागणार आहे.​- इच्छुक कंत्राटदारांना १९ मे २०२६ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील. त्यानंतर २० मे रोजी तांत्रिक निविदांचे पॅकेट ‘ए’ आणि ‘बी’ उघडले जातील.
- मुख्यालयातील आरोग्यदायी वातावरण राखण्यासाठी पालिकेने हा मोठा निर्णय घेतला आहे. पात्र कंत्राटदाराची निवड झाल्यानंतर तत्काळ कामाला सुरुवात होणार आहे.
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com