

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडून तिकीट तपासनीसाला मारहाण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता. ८) घडली. दंडाची कारवाई करण्यास विरोध करत संबंधित प्रवाशाने टीसीच्या डोक्यात ठोसे मारत धक्काबुक्की केल्याची तक्रार रेल्वे पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. अमित गणेश कोळी (वय ४२) हे सीएसएमटी येथे तिकीट तपासनीस म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारी ते एलटीटी येथे फलाट क्रमांक तीनवर उभ्या असलेल्या कामायनी एक्स्प्रेसच्या एस-९ बोगीत तपासणी करीत असताना एका तरुणाकडे तिकीट नसल्याचे आढळले. आईला सोडण्यासाठी आलो होतो, असे संबंधित तरुणाने सांगितले. मात्र नियमानुसार दंड भरावा लागेल, असे सांगितल्यावर तो संतापला. व त्याने कोळी यांना मारहाण केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.