

अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाई करा
परिवहनमंत्र्यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बेकायदा बाइक टॅक्सी ॲप सेवा तत्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी मंगळवारी (ता. १२) परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सायबर क्राइम विभागाकडे केली आहे. परिवहन आयुक्तांनीदेखील यासंदर्भात सायबर क्राइम विभागाकडे पत्र पाठविले आहे.
परिवहनमंत्री सरनाईक यांनी पत्रात नमूद केले आहे की, ‘राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ॲप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचे पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडोसारख्या संस्थांच्या अनधिकृत बाइक टॅक्सींचे प्रमाण वाढत असून, ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. या अनधिकृत सेवांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेची कोणतीही हमी नसून चालकांची पडताळणी, विमा संरक्षण, महिला सुरक्षाविषयक उपाययोजना तसेच आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, शासनाच्या परिवहन नियमांचे उल्लंघन करून या ॲप्समार्फत आर्थिक व्यवहार सुरू असल्याने परवानाधारक रिक्षा व टॅक्सीचालकांच्या व्यवसायावर अन्यायकारक परिणाम होत असल्याचे परिवहन विभागाने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.