

ईडीकडून रूपाली चाकणकरांची आठ तास चौकशी
मुंबई, ता. १४ ः भोंदू अशोक खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबत गुरुवारी महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुमारे आठ तास चौकशी केली.
चाकणकर सकाळी १०.३०च्या सुमारास ईडी कार्यालयात दाखल झाल्या. जबाब नोंदवून संध्याकाळी ७च्या सुमारास त्यांना सोडण्यात आले. आपला खरातच्या आर्थिक व्यवहारांशी आणि त्याने केलेल्या गुन्ह्यांशी काहीही संबंध नाही. तपासातून हे स्पष्ट होईल, असे चाकणकर यांनी ईडी कार्यालयाबाहेर येताच माध्यमांना सांगितले. गुवाहाटी येथे स्वतंत्रपणे गेल्याचा दावा त्यांनी केला. इतरांप्रमाणे खरातवर श्रद्धा होती; मात्र तेव्हा त्याच्या गुन्ह्यांबाबत काहीच कल्पना नव्हती, असे सांगितले.
चाकणकर यांच्याआधी त्यांच्या भगिनी प्रतिभा यांच्याकडे ईडीने चौकशी केली होती. खरातने सुरू केलेल्या नाशिक येथील श्री शिवलिका संस्थान ट्रस्टच्या चाकणकर विश्वस्त होत्या. खरातने विविध व्यक्तींना नाशिक येथील दोन पतसंस्थांमध्ये खाती सुरू करण्यास भाग पाडले; मात्र ही खाती स्वतःच्या नियंत्रणात घेत त्याद्वारे सुमारे ७० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा संशय ईडीला आहे. या व्यवहारात ट्रस्टच्या, विश्वस्त म्हणून चाकणकर यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग आहे का, याचा तपास ईडीकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.