मुंबईत मॉन्सूनचे आगमन

मुंबईत मॉन्सूनचे आगमन
Published on

मुंबईत मॉन्सूनचे आगमन
पुढील दोन दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २३ : मॉन्सूनच्या पावसाने आज सकाळीच मुंबईत आगमन केले. उपनगरांच्या तुलनेत शहरात पावसाचा जोर अधिक होता. सकाळी ८ ते रात्री ८ या १२ तासांच्या कालावधीत शहर भागात सरासरी ४५ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, रेल्वे वाहतूक आणि भुयारी मार्ग आज पूर्णपणे सामान्य होते.
​शहर परिसरात आज सकाळी ८ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, नायर रुग्णालय ७८.९६ मिमी, एन. एम. जोशी मार्ग महापालिका शाळा लोअर परेल ७४.४ मिमी, एफ-दक्षिण विभाग कार्यालय ७२.६३ मिमी पावसाची नोंद झाली. ​पश्चिम उपनगरे परिसरात मालाड डेपो ६१.८ मिमी, मालवणी फायर स्टेशन ५२.२ मिमी, तर ​पूर्व उपनगरे परिसरात महाराष्ट्रनगर शाळा मानखुर्द ५१.२ मिमी, पसपोली पवई महापालिका शाळा ३७.४ मिमी पावसाची नोंद झाली. रात्री ७ ते ८ या एका तासात बी विभाग कार्यालयाच्या परिसरात तब्बल ५४ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल मलबार हिल येथे २८ मिमी आणि पालिकेच्या मुख्यालय परिसरात २२ मिमी पाऊस पडला. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये मात्र या काळात हलका पाऊस सुरू होता. ​दरम्यान, दुपारी लोअर परेल आणि भायखळा परिसरात जोरदार सरी कोसळल्यामुळे काही काळ सखल भागात पाणी साचण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, पालिकेच्या तत्परतेमुळे वाहतूक सुरळीत राहिली. रेल्वेची वाहतूकही वेळेवर सुरू होती.
...
​पुढील पाच दिवसांचा अंदाज असा
​- हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर केला आहे.
- उद्या (ता. २४) काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
- गुरुवारी (ता.​ २५) ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहतील आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.
- त्यानंतर ​२६ आणि २७ जूनला पावसाचा जोर ओसरेल आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com