सालियन प्रकरणातून न्यायमूर्तींची माघार

सालियन प्रकरणातून
न्यायमूर्तींची माघार
Published on

सालियन प्रकरणातून न्यायमूर्तींची माघार
मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास बुधवारी (ता. २४) न्या. आशीष चव्हाण यांनी नकार दिला.
सुशांतच्या मृत्यूच्या पाच दिवसांपूर्वी ८ जून २०२०ला दिशाचा १४व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती; मात्र दिशाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप वडील सतीश यांनी याचिकेतून केला आहे. त्याची दखल घेऊन न्यायालयाने दिशाच्या मृत्यूच्या तपासातील दिरंगाईबद्दल राज्य सरकारला जाब विचारला होता. मृत्यूच्या पाच वर्षांनंतरही या प्रकरणातील तपास पूर्ण का झाला नाही, असा प्रश्नही खंडपीठाने उपस्थित केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com