

‘बीएलएस’च्या इंटरनॅशनलच्या सल्लागारपदी ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान
मुंबई, ता. २४ : बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लि. या कंपनीने ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान यांची कंपनीचे जागतिक धोरणात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
बीएलएस इंटरनॅशनल ही सरकारांसाठी एआय आणि टेक-आधारित नागरिक सेवा देणारी भागीदार आहे. मॉरिसन यांच्या आर्थिक, व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा मोठा फायदा कंपनीला होईल. सार्वजनिक पदावर येण्यापूर्वी आणि त्या कार्यकाळातही त्यांची कारकीर्द प्रामुख्याने बाजार अर्थशास्त्र (मार्केट इकॉनॉमिक्स), आर्थिक नियमन (फायनान्शियल रेग्युलेशन), पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) आणि व्यापार विविधीकरण (ट्रेड डायव्हर्सिफिकेशन) याभोवती केंद्रित होती. मॉरिसन यांचा, अनेक कंपन्यांचे संचालक मंडळ, खासगी शेअर व्यवहार ब्रोकिंग संस्था आणि जागतिक सल्लागार संस्थांसोबत प्रत्यक्ष काम करण्याचा उत्कृष्ट अनुभव आहे, असे कंपनीचे अध्यक्ष दिवाकर अग्रवाल यांनी सांगितले. पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात, मॉरिसन हे क्वाड लीडर्स डायलॉगचे (भारत व जपानचे पंतप्रधान आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह) संस्थापक सदस्य होते आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाचे भारतासोबतचे संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी पातळीवर नेले.
४६ पेक्षा जास्त सरकारांसोबत भागीदारी
२००५ मध्ये स्थापना झालेल्या व १०,८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजार भांडवलासह बीएलएस इंटरनॅशनल व्हिसा, कॉन्सुलर आणि नागरिक सेवा क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी सार्वजनिकरीत्या सूचीबद्ध कंपनी आहे. कंपनीने ३६ कोटींपेक्षा जास्त व्हिसा अर्जांवर प्रक्रिया केली आहे, ४६ पेक्षा जास्त सरकारांसोबत भागीदारी केली आहे आणि जगभरातील १०० पेक्षा जास्त देशांमधील नागरिकांना उत्कृष्ट सेवा दिली आहे. बीएलएस इंटरनॅशनल जागतिक स्तरावर ६०,००० पेक्षा जास्त समर्पित व्यावसायिकांना रोजगार देते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.