यूट्यूब चॅनल चालकाविरोधात गुन्हा

यूट्यूब चॅनल चालकाविरोधात गुन्हा
Published on

यूट्यूब चॅनल चालकाविरोधात गुन्हा

​मुंबई, ता. ३० : महापौरांचे पती असल्याचा खोटा दावा करत लालबाग येथील एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केल्याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी एका यूट्यूब चॅनल चालकावर गुन्हा दाखल केला आहे. गैरसमज पसरवून बदनामी केल्याप्रकरणी पोलिस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
​लालबाग येथे राहणारे आणि कणकवलीत स्टुडिओ चालवणारे तक्रारदार राजेश तावडे हे व्यावसायिक फोटोग्राफी शिक्षक आहेत. तक्रारीनुसार बुधवारी (ता.२६) त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना एका युट्यूब व्हिडिओची लिंक पाठवली. ‘जिके-शॉट- व्हिडिओज’ नावाच्या या चॅनलवर ‘राजनीता रितू तावडे के पति राजेश तावडे का जीवन परिचय’ या शीर्षकाखाली एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये तावडे यांचा फेसबुकवरील फोटो आणि महापौरांचा फोटो एकत्र जोडून, राजेश तावडे हे महापौरांचे पती असून ते बांधकाम व्यावसायिक असल्याचा दावा करण्यात आला होता. या ​शिक्षकाच्या तक्रारीची पोलिसांनी तत्काळ दखल गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात संबंधित यूट्यूब चॅनल १५ एप्रिल २०२६ रोजी सुरू झाले असून त्यावर राजकीय नेते आणि सेलिब्रिटींचे अनेक व्हिडिओ अपलोड असल्याचे समोर आले.
​कोणतीही शहानिशा न करता केवळ व्ह्यूज आणि प्रसिद्धीसाठी हा खोटी माहिती देणारा व्हिडिओ बनवल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. पोलिसांनी चॅनल चालकाचा शोध सुरू केला असून, या घटनेमुळे सोशल मीडियावर पसरणाऱ्या खोट्या माहितीचा आणि बदनामीकारक कंटेंटचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com