एसी लोकलचे दरवाजे वेळेत बंद होईनात

एसी लोकलचे दरवाजे वेळेत बंद होईनात
Published on

एसी लोकलचे दरवाजे वेळेत बंद होईनात
साध्या फेऱ्यांचा खोळंबा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर मंगळवारी सकाळच्या गर्दीच्या वेळेत एसी लोकलच्या स्वयंचलित दरवाजांमुळे साध्या लोकलच्या फेऱ्यांना विलंबाचा फटका बसला. सकाळी ८ ते ११ या वेळेत अप मार्गावर धावणाऱ्या तीन एसी लोकलचे दरवाजे प्रवाशांच्या गर्दीमुळे निर्धारित वेळेत बंद झाले नाहीत. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि घाटकोपर स्थानकांवर एसी लोकलचा थांबा वाढला. त्याचा परिणाम मागून येणाऱ्या साध्या लोकलच्या वेळापत्रकावर झाला.
गर्दीच्या वेळेत लोकल फेऱ्यांमधील अंतर कमी असल्याने एसी लोकलच्या थांब्यात झालेला काही सेकंदांचा विलंबही पुढील लोकलच्या परिचालनावर परिणाम करतो. मंगळवारच्या घटनेत एसी लोकलचे दरवाजे पूर्णपणे बंद होईपर्यंत गाडीला थांबावे लागल्याने मागून येणाऱ्या साध्या लोकलला सिग्नल मिळण्यास विलंब झाला. परिणामी, काही साध्या लोकलना पुढील स्थानकांवरही प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे फलाटांवर प्रवाशांची गर्दी वाढली आणि पुढील लोकलमध्येही नेहमीपेक्षा अधिक गर्दी झाली. प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागल्याने त्यांच्या प्रवासाच्या वेळेतही वाढ झाली. एसी लोकलच्या दरवाजांना सेन्सर असल्याने दरवाजाच्या मार्गात प्रवासी असल्यास ते बंद होत नाहीत. गर्दीच्या वेळेत दरवाजांजवळ मोठ्या संख्येने प्रवासी असल्याने ही समस्या अधिक तीव्र होते. दरवाजे पूर्णपणे बंद झाल्यानंतरच लोकल मार्गस्थ करता येते. लोकल फेऱ्या एकामागोमाग धावत असल्याने एसी लोकलच्या थांब्यात झालेला किरकोळ विलंबही मागील लोकलपर्यंत पोहोचतो. परिणामी, साध्या लोकलला सिग्नलच्या प्रतीक्षेत थांबावे लागते. या विलंबामुळे पुढील फेऱ्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढते आणि चढ-उतारासाठीही अधिक वेळ लागतो.
...
प्रमाण तुलनेने कमी पण...
मध्य रेल्वेवर दररोज १,८२० लोकल फेऱ्या धावतात. त्यापैकी १२० फेऱ्या एसी लोकलच्या आहेत. एसी लोकलचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी गर्दीच्या वेळेत त्यांच्या थांब्याचा कालावधी वाढल्यास त्याचा परिणाम मोठ्या संख्येने धावणाऱ्या साध्या लोकलवर होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com