

तांत्रिक बिघाडाने ४८ लोकल रद्द
टिटवाळा, खडवलीतील प्रकार; अनेक फेऱ्यांना विलंब
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील प्रवाशांना गुरुवारी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. टिटवाळा आणि खडवली स्थानकांदरम्यान अवघ्या काही तासाच्या फरकाने तांत्रिक बिघाड झाल्याने ४८ लोकल रद्द करण्यात आल्या, तर शंभरहून अधिक फेऱ्यांना विलंब झाला. त्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक दिवसभरासाठी विस्कळित झाले. त्यामुळे अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
टिटवाळा स्थानकादरम्यान दुपारी १२.४५ वाजता पॉइंट फेल झाल्याचे निदर्शनास आले. माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले. अखेर दुपारी १.४५ वाजता पॉइंटचा बिघाड दूर झाल्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात आली. टिटवाळ्यातील बिघाड दूर होत नाही, तोच खडवली स्थानकात दुपारी १.१४ वाजता इन्स्ट्रुमेंटमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. सुरक्षिततेच्या कारणास्तव लोकल धीम्या गतीने चालविण्यात आल्या. दुपारी २.१४ वाजता बिघाड दूर झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
---
स्थानकांवर प्रचंड गर्दी
सलग दोन तांत्रिक बिघाडांचा सर्वाधिक फटका कल्याण आणि कसाऱ्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला. ४८ लोकल फेऱ्या रद्द झाल्याने कल्याण, डोंबिवली, ठाण्यासह अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. अनेक फेऱ्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना अक्षरशः कोंडीतून प्रवास करावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.