नागरिकांना एसआरएकडून झटपट तक्रार करता येणार

नागरिकांना एसआरएकडून झटपट तक्रार करता येणार
Published on

नागरिकांना एसआरएकडून झटपट तक्रार नोंदवता येणार
मुख्यालयात चार कियोस्क मशीन स्थापित; २२ सेवांसाठी अर्ज करता येणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : आपल्या वेगवेगळ्या तक्रारी घेऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कार्यालयात (एसआरए) येणाऱ्या नागरिकांना आता झटपट आपल्या तक्रारी नोंदवता येणार आहेत. त्यासाठी एसआरए प्राधिकरणाने आपल्या मुख्यालयात चार सेल्फ ऑपरेटिंग कियोस्क मशीन स्थापित केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची तक्रार काय आहे किंवा कोणत्या प्रकारचा अर्ज करावयाचा आहे तो पर्याय निवडून काही मिनिटांत आपली तक्रार नोंदवता येणार आहे.
सर्वसामान्य झोपडीधारक आपल्या वेगवेगळ्या कामासाठी किंवा तक्रार नोंदवण्यासाठी म्हाडा कार्यालयात येतात; मात्र आपली तक्रार कुठे आणि कशी नोंदवावी, याबाबत पुरेशी माहिती नसल्याने त्यांची गैरसोय होते. त्याची दखल घेत एसआरएने मैत्री कक्षात आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी चार सेल्फ ऑपरेटिंग कियोस्क मशीन लावल्या आहेत. त्यावर नागरिकांना मोबाईल नंबर नोंदणी करून विकसकाने थकवलेले भाडे, घराचा ताबा देण्यास होणारा विलंब, प्रकल्प रखडवणे, अशा सर्वच प्रकारच्या तक्रारी केवळ पर्याय निवडून नोंदवता येणार आहेत. तसेच तर वारसांची नोंद करणे, ट्रान्स्फर ऑफ टेनन्सी, परिशिष्ट-२ बाबतच्या माहितीकरिता अर्ज करता येणार आहे. या सेवेमुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाशी संबंधित नागरिकांच्या समस्या व प्रश्नांचे निराकरण अधिक वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने होण्यास मदत होणार आहे.

मदतनीस उपलब्ध
एसआरएमध्ये आपली तक्रार घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कियोस्क मशीनचा वापर करणे शक्य होईलच असे नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय टाळण्यासाठी मैत्री कक्षात असलेल्या मदतनीसांची मदत घेता येईल, असेही एसआरएच्या अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com