

न्या. त्रिपाठी ‘मुंबई’चे नवे मुख्य न्यायमूर्ती
न्या. रवींद्र घुगे यांना पदोन्नती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. महेश चंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान प्रभारी मुख्य न्या. रवींद्र घुगे यांची पदोन्नतीवर कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बढती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने याबाबत केलेल्या शिफारशीला राष्ट्रपतींनी शनिवारी (ता. ६) रात्री उशिरा मंजुरी दिली.
न्या. त्रिपाठी हे मुंबई उच्च न्यायालयाचे ५०वे मुख्य न्यायमूर्ती ठरणार आहेत. त्यांनी १९९०मध्ये लखनऊ विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यांनी दिवाणी प्रकरणे प्रामुख्याने लढवली आहेत आणि ऑक्टोबर २००७ पासून उत्तर प्रदेशचे अतिरिक्त स्थायी वकील म्हणून कार्यरत होते. त्यानंतर २७ सप्टेंबर २०१३ रोजी त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आणि १० एप्रिल २०१५ रोजी ते कायमस्वरूपी न्यायमूर्ती म्हणून काम पाहत होते. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात जवळपास १३ वर्षे कार्यरत असलेले न्या. घुगे यांची या वर्षी जूनमध्ये प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती.
...
मराठा आरक्षणावर परिणाम
न्या. घुगे यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठापुढे सध्या सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याबाबत गेल्या वर्षभरापासून नियमित सुनावणी सुरू होती. या प्रकरणासाठी आता नव्याने पूर्णपीठ स्थापन करावे लागेल आणि प्रकरणाची पुन्हा नव्याने सुनावणी घ्यावी लागेल. याचिकाकर्त्यांसह आरक्षणाला विरोध करणाऱ्या पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून सध्या राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांचा युक्तिवाद सुरू होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.