

कोस्टल रोडच्या बोगद्यातील
अपघातामुळे वाहतूक कोंडी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : कोस्टल रोडवरील नरिमन पॉइंटवरून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या बोगद्यामध्ये भरधाव कार आणि टॅक्सीमध्ये जोरदार धडक झाली. हा अपघात सायंकाळी झाल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिणामी, संपूर्ण मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. यामुळे सायंकाळी घरी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले.
अपघाताची माहिती मिळताच मुंबई ट्रॅफिक पोलिस आणि पालिकेच्या आपत्कालीन बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. पोलिस कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्याचे काम सुरू केले; मात्र सायंकाळच्या वेळी रस्त्यावर वाहनांचा प्रचंड ताण असल्याने बऱ्याच वेळेपर्यंत वाहने धीम्या गतीने जात होती. पोलिसांच्या तत्परतेमुळे वेळेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले.
उपाययोजना अधिक कडक करणार
बोगद्याच्या आत वेगावर नियंत्रण ठेवावे आणि निश्चित केलेल्या वेग मर्यादेचे पालन करावे, जेणेकरून असे अपघात टाळता येतील, असे आवाहन महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिस विभागाने केले आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी बोगद्याच्या आत सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक केल्या जात असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.