

दिवा-मुंब्रादरम्यान
लोकलमधून महिला पडली
मुंबई, ता. १० : डोंबिवलीहून सकाळी ७.५६ वाजता सुटलेल्या लोकलमधून दिवा-मुंब्रा वळणावर एक महिला खाली पडल्याची घटना गुरुवारी घडली. लाल सिग्नलमुळे लोकल थांबलेली असल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत महिलेला किरकोळ दुखापत झाली असून, तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळची गर्दीची वेळ असल्याने लोकलमध्ये मोठी गर्दी होती. अनेक प्रवासी दरवाजाला लटकून प्रवास करीत होते. दिवा स्थानकातून मुंब्राच्या दिशेने जात असताना वळणावर सिग्नल लागल्याने लोकल थांबली. त्याच वेळी दरवाजाजवळील महिला खाली पडली. लोकल थांबलेली असल्याने ती गाडीखाली जाण्याचा गंभीर धोका टळला. लोकल वेगात असताना ही घटना घडली असती, तर महिलेच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी दरवाजाला लटकून प्रवास टाळावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले.
---
वाद झाला का, याचीही चौकशी
महिला थांबलेल्या लोकलमधून पडली असून, तिला किरकोळ दुखापत झाली आहे; मात्र ती वादातून किंवा प्रवाशांसोबत झालेल्या धक्काबुक्कीमुळे पडली का, याचीही चौकशी करण्यात येत आहे. घटनेमागील नेमके कारण चौकशीनंतर स्पष्ट होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.