

मुंबई, ता. १३ : मुंबईकरांना घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर या प्रवासात टॅक्सीचालक अनेकदा भाडे नाकारतात. यावर उपाय म्हणून टॅक्सीवर हिरवा, लाल, पांढरा असे तीन दिवे लावण्याचा निर्णय १ फेब्रुवारी २०२०ला घेण्यात आला, मात्र याला रिक्षा-टॅक्सी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविल्यामुळे रखडला. याबाबत निर्णय होण्याची शक्यता धूसरच असून, मुंबईकरांची भाडे नाकारण्यापासून सुटका होणार नाही.
१ फेब्रुवारी २०२०पासून नव्या टॅक्सीची नोंद करताना छतावर दिवे बसविल्याची खात्री करूनच गाडीची नोंदणी करावी, अशी अधिसूचना नोव्हेंबर २०१९ मध्ये सरकारने काढली होती, तर जुन्या टॅक्सीला छतावर दिवे बसवण्यासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली. या निर्णयाला सहा वर्षांहून अधिक काळ उलटला आहे; मात्र यावर पुढील निर्णय झालेला नाही.
असे असतील तीन दिवे
टॅक्सीवर हिरवा, लाल आणि पांढरा, असे तीन दिवे असतील. हिरवा दिवा सुरू असल्यास टॅक्सी भाडे घेण्यास उपलब्ध आहे, असे प्रवाशांनी समजावे, तर लाल दिवा असेल, तर त्यात प्रवासी आहे, असे समजावे. त्याच वेळी पांढरा दिवा पेटता असेल, तर टॅक्सी सध्या भाडे स्वीकारण्यासाठी उपलब्ध नसेल, असा त्याचा अर्थ होईल. हे दिवे एलईडी असणार असून, प्रत्येक दिव्याचा अर्थ मराठी आणि इंग्रजीतून लिहिणे बंधनकारक असणार आहे, तर तिन्हीपैकी एक दिवा पेटता ठेवणेही गरजेचे असणार आहे.
अनधिकृत खासगी टॅक्सी परिवहन विभागाकडून प्रोत्साहन दिले; मात्र नियमाने चालणाऱ्या टॅक्सीचालकांना अडचणीत आणले. नवे नवे नियम त्यांच्यावर लादले जात आहेत. टॅक्सीवर दिवा लावण्याची आवश्यकता नाही.
- के. के. तिवारी, अध्यक्ष, भाजप रिक्षा टॅक्सी सेल
रिक्षा, टॅक्सीला दिवा लावण्याबाबत निर्णय विचाराधीन आहे. त्याला काही संघटनांनी विरोध केला होता; मात्र त्याबाबत लवकरच आम्ही निर्णय घेऊन हा विषय मार्गी लावणार आहे.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.