

टिळकनगरमधील १५ मजली इमारतीत आग
अग्निशमन दलाकडून ३३ जणांची सुखरूप सुटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : टिळकनगर येथील एका १५ मजली निवासी इमारतीत बुधवारी (ता. १६) सायंकाळी अचानक आग लागल्याची दुर्घटना घडली. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आणि इमारतीत अडकलेल्या ३३ रहिवाशांची गच्चीवर (टेरेस) सुरक्षितपणे सुटका केली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.
महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर. एस. मणी कॅफेजवळ असलेल्या टिळकनगर रोड क्रमांक १३ वरील इमारत क्रमांक ११०, बी विंग या तळ अधिक १५ मजली इमारतीतील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ४०२ मध्ये आज सायंकाळी ७:१५ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीमुळे खोलीतील इलेक्ट्रिक वायरिंग, विद्युत उपकरणे, सीलिंग, लाकडी फर्निचर आणि महत्त्वाची कागदपत्रे खाक झाली.
या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस, स्थानिक पालिकेचे वॉर्ड आणि बी अँड एफ कर्मचारी, १०८ रुग्णवाहिका आणि संबंधित वीज वितरण कंपनीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेचा उपाय म्हणून इमारतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी श्वासोच्छ्वास यंत्रणेचा वापर करून धुराच्या लोटात प्रवेश केला आणि एका छोट्या होस लाईनच्या सहाय्याने रात्री ८:०१ वाजता आग पूर्णपणे विझवली. आगीदरम्यान निर्माण झालेल्या धुरामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाने तत्परता दाखवत ३३ रहिवाशांना सुरक्षितपणे इमारतीच्या गच्चीवर हलवले. सर्व नागरिक पूर्णपणे सुरक्षित असून, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
.............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.