

‘मातोश्री’च्या दारात गाेंधळ
आदित्य ठाकरेंना ५०० कोटींची मानहानी नाेटीस
दिशा सालियन मृत्यू प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा वाद शनिवारी थेट ‘माताेश्री’च्या दारात पाेहाेचला. दिशाचे वडील सतीश सालियन हे ५०० काेटींची मानहानीची नाेटीस देण्यासाठी आपल्या वकिलांसह थेट ठाकरेंच्या निवासस्थानी पाेहाेचल्याने गाेंधळ उडाला. यामुळे माताेश्री परिसरात जवळपास अर्धा तास तणावपूर्ण वातावरण हाेते. पाेलिसांच्या मध्यस्थीनंतर ठाकरेंच्या वकिलांनी नाेटीस स्वीकारली.
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आराेप करण्यात आले आहेत. याप्रकरणी सतीश सालियन आणि त्यांचे वकील नोटीस देण्यासाठी येत असल्याची माहिती मिळताच ‘मातोश्री’बाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून कलानगरचे मुख्य प्रवेशद्वारच बंद केले. सालियन तेथे पोहोचताच जमलेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ‘आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना केवळ राजकीय सूडबुद्धीने आणि बदनामी करण्याच्या हेतूने हे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत,’ असा आरोप शिवसैनिकांनी केला. सुमारे २५ ते ३० मिनिटे चाललेल्या या अभूतपूर्व नाट्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने मार्ग काढण्यात आला. अखेर आदित्य ठाकरे यांच्या कायदेशीर पथकातील वकिलांनी ‘मातोश्री’च्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन सतीश सालियन आणि त्यांच्या वकिलांकडून ती ५०० कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस स्वीकारली.
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सालियन करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी थेट ‘मातोश्री’ गाठून ही कायदेशीर नोटीस बजावल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.