‘पूजा तूप’च्या नावाखाली भेसळ

‘पूजा तूप’च्या नावाखाली भेसळ
Published on

‘पूजा तूप’च्या नावाखाली भेसळ
विविध कारणांमुळे पाच आस्थापनांचे परवाने निलंबित

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : सणासुदीच्या काळात मालाड पूर्वेतील एका डेअरीत रिफाइंड सनफ्लॉवर तेल, वनस्पती तूप आणि ब्रँडेड तूप एकत्र करून भेसळयुक्त तूप तयार केले जात होते. त्यानंतर हे तूप ‘पूजा तूप’ या नावाने बाजारात विक्रीसाठी पाठवले जात होते. अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत ही बाब उघड झाली असून, या ठिकाणी उंदीर आणि झुरळांचा प्रादुर्भावही आढळला. प्रशासनाने सुमारे १५ लाख १५ हजार ५९७ रुपये किमतीचा साठा आणि यंत्रसामग्री जप्त केली असून, आस्थापनेचा परवाना तत्काळ निलंबित केला आहे.
मालाड पूर्वेतील पंडित सॉलिटरी लेन, बिश्त चाळ येथील मे. गुरुकृपा डेअरी प्रॉडक्ट्स या आस्थापनेवर २१ सप्टेंबरला कारवाई करण्यात आली. या कारवाईत २,४६४.०५ किलो तूप, रिफाइंड सनफ्लॉवर तेल आणि वनस्पती तूप जप्त करण्यात आले. या साठ्याची किंमत सुमारे १३ लाख ५५ हजार ५९७ रुपये आहे. साठा आणि यंत्रसामग्री मिळून जप्त मुद्देमालाची किंमत १५ लाख १५ हजार ५९७ रुपये असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
...
परवान्याविनाच व्यवसाय
वर्सोवा-यारी रोड येथील मे. गुफरान सीख कॉर्नरवरही एफडीएने कारवाई केली. ही आस्थापना वैध अन्न परवाना किंवा नोंदणीशिवाय सुरू असल्याचे तपासणीत आढळले. तसेच अनेक नियमांचे उल्लंघन आढळले. त्यामुळे आस्थापनेचा व्यवसाय तत्काळ बंद करून वैध परवाना किंवा नोंदणी मिळेपर्यंत आणि सर्व त्रुटींची पूर्तता होईपर्यंत व्यवसाय पुन्हा सुरू न करण्याचे आदेश देण्यात आले.
...
बर्फावर रक्ताचे डाग
महालक्ष्मी रेसकोर्समधील मे. बीजेआरएस (गॅलॉप्स) रेस्टॉरंटच्या तपासणीतही गंभीर स्वच्छताविषयक त्रुटी आढळल्या. फ्रीजमधील बर्फावर मांसाहारी पदार्थांचे रक्त आणि केचअपचे डाग आढळले. विविध त्रुटींमुळे या आस्थापनाचा परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला.
...
दोन आस्थापनांवर कारवाई सुरू
वांद्रे पश्चिम येथील मे. ड्रीमर हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि मे. मिरारी या दोन आस्थापनांचीही तपासणी करण्यात आली. दोन्ही ठिकाणी अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित विविध तरतुदींचे उल्लंघन आढळल्याने कारवाई सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com