‘शिवशाही’ला सदनिका देण्यास टाळाटाळ

‘शिवशाही’ला सदनिका देण्यास टाळाटाळ
Published on: 

मुंबई, ता. २ : विकास नियंत्रण नियमावली ३३ (१०) नुसार पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून एसआरए प्राधिकरणाला मिळणाऱ्या सदनिका शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाला देण्याचा ‘एसआरए’चा ठराव आहे. मात्र, गेल्या वर्षभरात उपलब्ध झालेली सुमारे १,२०० घरे शिवशाहीला देताना एसआरएने हात आखडता घेतला आहे. यावरून ‘एसआरए’ला आपल्याच ठरावाचा विसर पडला असल्याचे शिवशाहीच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना चालना देण्यासाठी राज्य सरकारने १९९८मध्ये स्वमालकीची शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेड ही कंपनी स्थापन केली आहे. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प राबवताना झोपडीधारकांची तत्पुरती निवासाची सोय संक्रमण सदनिकांमध्ये करावी लागते. मात्र तेव्हा शिवशाहीकडे पुरेशा संक्रमण सदनिका नसल्याने १९९९ मध्ये राज्य सरकारच्या निर्देशानुसार एसआरएने विकसकांकडून उपलब्ध होणाऱ्या सदनिका शिवशाहीला उपलब्ध करून देण्याचा ठराव केला होता. त्यानुसार एसआरएने आतापर्यंत पाच हजारांहून अधिक सदनिका शिवशाहीला उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र गेल्या वर्षभरात सुमारे १,२०० सदनिका एसआरने शिवशाहीला न देता स्वत:कडे ठेवून घेतल्या असल्याची माहिती शिवशाहीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले. त्यांना शिवशाहीला सदनिका द्यायच्या नसतील तर त्यांनी आपला ठराव बदलायला हवा, असे शिवशाहीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

म्हणे आमचा मालमत्ता विभाग आहे!
याबबात ‘एसआरए’कडे विचारणा केली असता आमच्याकडे याआधी इस्टेट विभाग नव्हता. त्यामुळे पुनर्विकासाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या सदनिका शिवशाहीला दिल्या जात होत्या. आता आम्हीची इस्टेट विभाग सुरू केला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात शिवशाहीला सदनिका दिल्या नसल्याचे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com