कलानगरमध्ये आठ फूट अजगराची सुरक्षित सुटका

कलानगरमध्ये आठ फूट अजगराची सुरक्षित सुटका
Published on: 

कलानगरमध्ये आठ फूट अजगराची सुरक्षित सुटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : वांद्रे पूर्वेतील कलानगर परिसरातील झोपडपट्टीत शिरलेल्या सुमारे आठ फूट लांबीच्या अजगराची सर्पमित्रांनी दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुरक्षित सुटका केली. सोमवारी (ता. ५) सकाळी रस्त्यालगतच्या झोपडपट्टी परिसरात अजगर आढळून आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी तत्काळ सर्पमित्र अतुल कांबळे आणि पोलिस सर्पमित्र सचिन मोरे यांना माहिती दिली. कांबळे यांनी वांद्रे राउंडचे ऑफिसर दीपक गायकवाड तसेच मुंबई रेंज कंट्रोल रूमला याबाबत कळविले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर नागरिकांनी अजगराचा व्हिडिओ सर्पमित्रांना दाखविला. नागरिकांची गर्दी आणि कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे अजगराने जवळच असलेल्या लोखंडी खांबात आसरा घेतला होता. अजगराला इजा होऊ नये, यासाठी खांब सावधपणे हलवून मोकळ्या जागेत आणण्यात आला. त्यानंतर पाइपमध्ये अडकलेल्या अजगराला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. दीड ते दोन तासांच्या प्रयत्नांनंतर अजगर बाहेर आला. सचिन मोरे यांनी सावधगिरीने त्याचा ताबा घेत सुरक्षितपणे त्याला बाहेर काढले. या घटनेनंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, १८ सप्टेंबरला याच परिसरात ११ फूट अजगराने मांजरीला ठार केल्याची घटना घडली होती. हा अजगर बिनविषारी असून, वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com