दादर-नवी मुंबई विमानतळ ‘एसटी’ आजपासून सुरू

दादर-नवी मुंबई विमानतळ ‘एसटी’ आजपासून सुरू
Published on: 

दादर-नवी मुंबई विमानतळ ‘एसटी’ आजपासून सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बससेवा बुधवार (ता. ७) पासून सुरू करण्यात येणार आहे. परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या विमानतळ बससेवेला सुरुवात होणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारे महत्त्वाकांक्षी पाऊल आहे. विमानतळ उभारणीइतकेच महत्त्वाचे म्हणजे त्याला मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोकण तसेच राज्याच्या विविध भागांशी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने जोडणे होय, या पार्श्वभूमीवर एसटीची दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बससेवा प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याबरोबरच बोरिवली ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, स्वारगेट ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी बससेवादेखील सुरू होत आहे. एसटीची ‘लालपरी’ आज राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. या व्यापक जाळ्याचा उपयोग करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत प्रवाशांना सहज आणि सुलभपणे पोहोचता यावे, यासाठी एसटी महामंडळाकडून टप्प्याटप्प्याने आवश्यक बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दादर हे मुंबईतील प्रमुख वाहतूक केंद्र असल्याने येथून विमानतळासाठी सुरू होणारी थेट बससेवा प्रवाशांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एसटीचे व्यापक सार्वजनिक वाहतूक जाळे यांचा समन्वय महाराष्ट्राच्या विकास प्रवासातील महत्त्वाचा दुवा ठरणार असून, प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी, दर्जेदार विमानतळ बससेवा देण्याचा एसटी महामंडळाचा संकल्प असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी एसटीची विमानतळ बससेवा महत्त्वपूर्ण ठरेल. विमानतळाला एसटीच्या व्यापक सार्वजनिक वाहतूक जाळ्याशी जोडल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, विद्यार्थी तसेच विमानप्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह, प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री


मार्ग - फेऱ्या प्रौढ तिकीट - मुलांचे तिकीट
बोरिवली - नवी मुंबई विमानतळ १६ -२१०-१०५
दादर - नवी मुंबई विमानतळ - ३२- १७०- ८५
स्वारगेट - नवी मुंबई विमानतळ - ४ -४५५ -२३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com