‘महिंद्रा वर्कर्स’च्या सरचिटणीसपदाचा लाड यांनी स्वीकारला पदभार

‘महिंद्रा वर्कर्स’च्या सरचिटणीसपदाचा लाड यांनी स्वीकारला पदभार
Published on: 

मुंबई, ता. ८ : कांदिवली येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील गेल्या सात दशकांपासून कार्यरत असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा वर्कर्स युनियनच्या सरचिटणीसपदाचा पदभार आमदार प्रसाद लाड यांनी बुधवारी (ता. ७) स्वीकारला.

श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष म्हणून आमदार प्रसाद लाड गेल्या काही वर्षांपासून कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. कामगारांचे प्रश्न प्रशासनाच्या पातळीवर मांडणे, संबंधित यंत्रणांशी संवाद साधणे आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे, या माध्यमातून त्यांनी कामगार क्षेत्रात त्यांनी आपली भूमिका अधिक सक्रिय केली आहे. दीर्घ आणि समृद्ध कामगार चळवळीची परंपरा या संघटनेला लाभली आहे. अनेक ज्येष्ठ कामगार नेत्यांनी या संघटनेचे नेतृत्व केले आहे. अशा ऐतिहासिक संघटनेची जबाबदारी मिळणे, हा माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठा विश्वास आणि जबाबदारी आहे, अशी भावना आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केली.

संघटनेच्या माध्यमातून कंपनीतील हजारो कामगारांच्या हिताचे संरक्षण करतानाच कंपनीचा विकास आणि कामगारांचे कल्याण यांचा समतोल साधण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असे त्यांनी सांगितले. या वेळी महिंद्रा अँड महिंद्रा वर्कर्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांसह श्रमिक उत्कर्ष सभेचे भालचंद्र साळवी, बाबा कदम, अध्यक्ष सुहास गोरे, रोहित केणी, महेश सावंत, श्रीकांत शेट्टी, संजय दरेकर, अमेय लाड, माणिक मोरे, देवेंद्र खैरे तसेच युनियनच्या कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कामगार सहकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com