

मत्स्यव्यवसायास तंत्रज्ञानाचे बळ!
नितेश राणे ः आंध्र प्रदेशातील प्रयोग महाराष्ट्रात वापरणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : महाराष्ट्रातील मच्छीमार आणि मत्स्य शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आंध्र प्रदेशातील उपयुक्त प्रयोगांचा राज्यात वापर केला जाणार असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
आंध्र प्रदेशातील मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालन क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादकता वाढीच्या उपाययोजना आणि एकात्मिक मूल्यसाखळीचा महाराष्ट्रासाठी अभ्यास करण्यात आला. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आंध्र प्रदेशच्या मत्स्य आयुक्तालयाच्या मुख्यालयाला भेट देऊन विविध तंत्रज्ञान आणि योजनांची माहिती घेतली. आंध्र प्रदेशच्या मत्स्य आयुक्तालयात झालेल्या बैठकीत सागरी आणि अंतर्देशीय मत्स्यव्यवसाय तसेच मत्स्यपालन क्षेत्रातील उत्पादकता वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मत्स्यपालन, मत्स्य आरोग्य व रोगांचे निरीक्षण, पाण्याच्या गुणवत्तेचे प्रत्यक्ष वेळेत परीक्षण, स्मार्ट पद्धतीने खाद्य देणे, माशांच्या वर्तनाचे विश्लेषण, आरएएस आणि बायोफ्लॉक तंत्रज्ञान तसेच इंटरनेट ऑफ थिंग्जवर आधारित मत्स्यपालन यांची माहिती घेण्यात आली.
...
उपयुक्त बाबींचा अभ्यास
आंध्र प्रदेशातील तंत्रज्ञान, माहितीच्या आधारे व्यवस्थापन आणि प्रशासकीय कार्यपद्धतीतील महाराष्ट्रासाठी उपयुक्त बाबींचा अभ्यास करून त्यांचा राज्यातील मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी वापर केला जाणार आहे. महाराष्ट्राच्या किनारी भागासह अंतर्देशीय जलस्रोतांचा अधिक शास्त्रीय आणि उत्पादक पद्धतीने वापर करून मच्छीमार, मत्स्य शेतकरी आणि किनारी समुदायांसाठी अधिक मूल्यनिर्मिती करण्यावर भर दिला जाणार असल्याचे राणे यांनी सांगितले.
...
मान्यवरांची उपस्थिती
आंध्र प्रदेशचे मत्स्य आयुक्त रामा नाईक, अतिरिक्त संचालक डॉ. शंकर राव, महाराष्ट्राचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्य आयुक्त भानुदास पालवे, महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, मत्स्यव्यवसाय तज्ज्ञ मनोज शर्मा, सहआयुक्त महेश देवरे, नागनाथ भादुले यांच्यासह आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.